नळदुर्ग - उस्‍मानाबाद जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्‍य खातेदारास बसल्‍याने नळदुर्ग येथील स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद व अणदूर (ता. तुळजापूर) येथील भारतीय स्‍टेट बँकेत अल्‍पावधीतच हजारो बचतखाते उघडले. त्‍याचा परिणाम बँकेची सेवा कोलमडल्‍याचे दिसून येत आहे. बँकेत अपुरे कर्मचारी असल्‍याने खातेदारास म्‍हणावी तशी सेवा उपलब्‍ध होत नसल्‍याने त्‍यांची कुंचबना होत आहे. त्‍यात शालेय, महाविद्यालय विद्यार्थी, ज्‍येष्‍ठ नागरीक, शेतकरी यांचा समावेश मोठयाप्रमाणावर असून बँकेची सेवा पुर्ववत करण्‍यासाठी तात्‍काळ नळदुर्ग व अणदूर येथे एटीएम सेवा सुरू करण्‍याची मागणी होत आहे. नळदुर्ग शहरांतर्गत परिसरातील 80 खेडयागावाचा दैनंदिन कामकाजासाठी दररोज संपर्क आहे. त्‍याचबरोबर अणदूर येथेही 25 ते 30 गावाचा दररोज कामकाजासाठी लोकांचा संपर्क आहे. हे दोन्‍ही गावे राष्‍ट्रीय महामार्गावर वसलेले गाव असून परिसरातील अनेक गावांचा व्‍यवहार या बँकेतून होते. त्‍यात साखर कारखाना, शासकीय, निमशासकीय शैक्षणिक संस्‍था याचा समावेश आहे. परिसरातील शासकीय कर्मचारी या भागात मोठयाप्रमाणावर या भागात राहत असून आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्‍ट्रातून श्री क्षेत्र खंडोबा, रामतीर्थ, नानीमॉं दर्गाह व इतर देवाच्‍या दर्शनासाठी भाविक मोठयाप्रमाणात ये‍थे येतात. येथूनच अक्‍कलकोट, गाणगापूर, तुळजापूर व चिवरीच्‍या महालक्ष्‍मीच्‍या दर्शनासाठीही भाविकांची दररोज वर्दळ असते. त्‍यांना ऐन अडचणीच्‍या वेळी आर्थिक पैशाची गरज असते. त्‍यासाठी नळदुर्ग, अणदूरला एटीएम सेवा सुरू करण्‍याची गरज आहे. राष्‍ट्रीय महामार्गालगत हे दोन्‍ही गावे असून सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध झाल्‍या असल्‍या तरी अद्यापपर्यंत याठिकाणी एटीएम सुविधा सुरू झाली नाही. सोलापूर ते उमरगा या 90 किलोमीटरच्‍या अंतरात व उमरगा ते तुळजापूर 75 किलोमीटर अंतरात कोठेही ही बँकेची सुविधा उपलब्‍ध नाही. याबरोबरच वरील बँकेत कर्मचारी संख्‍या अपुरी असल्‍याने बचत खातेदारांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. एटीएमची सेवा होण्‍यासाठीची वरिष्‍ठ कार्यालयास एक हजार ग्राहकांच्‍या सह्यांचे निवेदन अणदूर येथून देवून सहा महिने झाले आहे. अणदूर व मुरूम येथे एटीएम सेवा सुय करण्‍यासाठी वरिष्‍ठ कार्यालयाने परवानगी दिली असून मुरूम हे महामार्गावरून दहा किलोमीटर अंतरावर आत आहे. तेथे एटीएम एटीएम सेवा उघडली जाते, परंतू येथे मात्र गैरसोय सुरू आहे. त्‍यामुळे बँक ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
 
Top