नळदुर्ग  -  समाजातील दु:खी, कष्ट आणि अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळावा पाहिजे, त्यांच्या जिवनात आनंद निर्माण झाला तरच हा देश ख-या अर्थाने समृद्ध होईल आणि समाजातील दु:खीतांचे दु:ख ओळखून त्यावर आनंदाची आणि सुखाची फुंकार मारण्याचे कार्य आजपर्यंत अनाथ, निराधार आणि मादुकरी मागुन खाणा-या लोकांनीच केले आहे. धनदांडग्यांना हे दु:ख कधीच कळणार नाही, असे प्रतिपादन वसंतराव नागदे यांनी केले.
१७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधुन वसंतराव नागदे आपल्या संपूर्ण कुटुंब व मित्र मंडळीसोबत आपलं घर या राष्ट्र सेवा दल संचलित अनाथ निराधार मुला-मुलींना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी मुलाना सखोल मार्गदर्शन केले. सध्याच्या धक्काधकीच्या जीवनात आपल्या सभोवतालच्या बांधवांना काय हवंय हे विचारालाही लोकांना वेळ नाही आपलं घर, गाव, प्रांत आणि देश या साखळीतील महामानव हा केंद्रबिंदू असुनही त्याकडे उच्चभ्रु समजाणार्या धनाड्य लोकांचे अजिबाबत लक्ष नसते. तर गोरगरीब, दु:खी कष्टी अशा लोकांना स्वत: नियतीचे चटक सहन केलेल्या समाजातील अनाथ, निराधार आणि मादुकरी मागुन खाणा-यानीच सुखाने क्षण दाखवले आहेत. हा इतिहास आहे, असे ते म्हणाले.
आपलं घर सारख्या सेवाभावी संस्थेत अल्प मानधनावर निराधार मुलांच्या आयुष्यात आनंद फुलवणा-या सेवाभावी गृहमाता व कार्यकर्त्यांचे श्री. नागदे यांनी कौतुक केले. तसेच राष्ट्र सेवा दलासारख्या संस्कार श्रम संघटनेची आज गरजा असून राष्ट्र सेवा दलाच्या शाळेत ज्या मुलांना शिक्षण घ्यायला मिळते ते खरच भाग्यवान आहेत असे ते म्हणाले या वेळी राजेश नागदे, सौ. किर्ती, रवी नागदे, सौ. स्वाती नागदे, पत्रकार संजय पाठक, बालाजी पवार, सौ. नागदे ताई, धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपलं घरचे सचिव शिवाजी पोतदार यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर आभार संतोष बुरंगे यांनी मानले. यावेळी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्त नागदे कुटुंबियांच्यावतीने सर्व मुलांना गोड जेवण देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्‍यासाठी वसंत घोडके, श्रीराम पोतदार, खंडू मुळे, शिवराज सुर्यवंशी आणि जावेद नदाफ, अण्णा सनदी आदीनी प्रयत्‍न केले.
 
Top