नळदुर्ग :-   दहिटणा (ता. तुळजापूर) येथिल जय हनुमान तरुण गणेश मंडळाने यावर्षी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार गावात एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यामध्ये सर्व जातीधर्माना समान संधी देवून अध्यक्षपदी मुस्लीम समाजास बिनविरोध प्रतिनिधीत्व देवून सर्व धर्म समभाव जोपासून इंथेही राष्ट्रीय एकात्मता असल्याचे गावकर्‍यानी गणेश उत्सवाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. यावर्षी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून आगळ्यावेगळ्या त-हेने गणेशोत्सव साजरा केल्याने परिसरात मंडळाबद्दल कुतूहल निर्माण झाले असूनमंडळाचेअभिनंदन करण्यात येत आहे.या मंडळाचा आदर्श इतर मंडळानी घेण्यासारखाच आहे.
                   अध्यक्ष आसिफ हिरालाल शेख, उपाध्यक्ष नागेश इराण्‍णा पाटील, कार्याध्यक्ष गहिनीनाथ कदम, सचिव रोहित नागरसे, श्रीकांत पाटील, शंकर चव्हाण, सोमनाथ गुड्डे, सल्लागार सचिन पाटील, भीम कुंभार, विजय पाटील, मिरवणुक प्रमुख सरपंच बसवराज पाटील, उपसरपंच उमाकांत कदम, सदस्य माजी सरपंच सुर्यकांत पाटील, मच्छिंद्र माने, राजेंद्र माने, आप्पासाहेब पाटील, अविनाश पाटील, फैय्याज सावकार, संजयराव कदम, बलभीम कदम, शंतनु कदम, विवेक कदम, प्रकाश गुड्डे, विकास कदम, मारुती गुड्डे, राहुल पाटील, मोहन गुरव, अर्जून कुंभार, संतोष भोंडवे, अमोल कदम, दत्ता कुंभार, इरफान शेख, सदाम शेख, शरद कांबळे आदीजणअसून गणेशोत्सवाच्या कालावधीत दैनंदिन पूजाअर्चा गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थ, महिला, बालचमू एकत्र येवून करीत आहेत. यापुढे स्त्री भ्रूण हत्या विरोधात समाजात जनजागृती करुन गावातील कायमची दारुबंदी युवकांच्या सहकार्याने करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आसिफ शेख यानी बोलताना सांगितले.
                         रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, निबंध स्पर्धा, डान्स स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी स्‍पर्धा घेण्‍यात आले. रचनात्मक संघर्ष समितीच्यावतीने ‘आजची युवा पिढी कशी असली पाहिजे’ या विषयावरती प्राचार्य राजेंद्र गायकवाड यानी मार्गदर्शन केले. लोकमंगल मल्ट्रीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन रोहन देशमुख, तुळजापूर पंचायत समिती सदस्य अर्जून कदम यांनी भेट दिली.


 
Top