मुंबई -: राज्यात दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक 31 ऑक्टोबर या जन्म दिवसापासून एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे' आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्था यांचेमार्फत या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने कार्यालये, शाळा, महाविद्यालय यामध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करण्यात येणार असून यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिके देण्यात येणार आहेत. समाजातील निष्कलंक स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था, सामान्य नागरिक आदींना या दक्षता         जनजागृती मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून या सप्ताह कालावधीत तालुका व गावपातळीवर ग्रामसभा आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

 
Top