मुंबई -: निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी प्रतिवर्षीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला ते निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमार्फत सादर करणे आवश्यक आहे, त्यानुसार नोव्हेंबर 2012 मध्ये सादर करावयाच्या हयातीच्या दाखल्यांची यादी संबंधीत बँकेकडे पाठविण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2012 या कालावधीत संबंधीत बँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नावासमोर स्वाक्षरी करावी अथवा अंगठा लावावा. पुनर्नियुक्ती पुनर्विवाहाबाबत लागू असल्यास निवृत्तीवेतनधारकांनी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या निवृत्तीवेतनधारकांनी यादीतील नावासमोर सही/अंगठा केलेला नसेल अशा निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन माहे डिसेंबर, 2012 पासून स्थगीत करण्यात येईल, असे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे.

 
Top