मुंबई -: राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी बकरी ईदनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात की, बकरी ईद हा सण जगभरात मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने प्रेषित इब्राहीम यांच्या त्यागाची आपणास आठवण होते. मुस्लिम धर्माने नेहमीच दान, गरीबांची आणि तळागाळातील जनतेची सेवा याला महत्त्व दिलेले आहे. बकरी ईदच्या या आनंदमयी दिनानिमित्त सर्व जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.

 
Top