उस्मानाबाद :-  राज्य शासनाच्या सुधारीत निर्णयानुसार चालू वर्षासाठी उस्मानाबाद तालुक्यातील पाच महसूल मंडळाचा हवामान आधारीत फळपिक विमा योजनेत केळी या पिकाचा समावेश केला आहे. द्राक्षे या पिकाचा उस्मानाबाद तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश यापुर्वीच झालेला आहे. सुधारीत शासन निर्णयानुसार केळी पिकाचा तेर, ढोकी, बेंबळी, उस्मानाबाद (ग्रा). उस्मानाबाद शहर  या पाच महसूल मंडळाचा समावेश केला असून विमा सहभागाची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोंबर 2012 अशी आहे.
विमा हप्त्याची निम्मी रक्कम राज्य/केंद्र शासनामार्फत थेट विमा कंपन्याना देण्यात येणार असून शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम या पिकासाठी 6 हजार प्रती हेक्टरी व विमा संरक्षण एक लाख  आहे व त्यासाठी संरक्षण कालावधीत 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2012 हा कमी तापमानासाठी तर 1 मार्च ते 31 जुलै 2012 हा वेगाचा वारा यासाठी ग्राहृय धरला जाईल.
तरी संबधित मंडळातील, तालुक्यातील सर्व बँकामध्ये शेतकऱ्यांना विमा सरंक्षण मिळण्यासाठी हप्ता भरण्याची सुविधा विमा कंपनीमार्फत  उपलब्ध करण्यात आलेली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एस. पी. जाधव, तालुका कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे
 
Top