उस्मानाबाद -: महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदि उपस्थित होते. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यावेळी पुष्प अर्पण करुन महर्षी वाल्मीकींना अभिवादन केले.


* दक्षता  जनजागृती सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ
उस्मानाबाद, दि. 29: दक्षता जनजागृती सप्ताहा निमित्त जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात  सर्व विभाग व कार्यालय  प्रमुखांना प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ दिली.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदि उपस्थित होते.  यावेळी  खात्याचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.                                              

 
Top