* महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 397 जागा
            महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात संशोधन सहायक (59 जागा), सांख्यिकी सहायक (175 जागा), अन्वेषक (77 जागा), लिपिक टंकलेखक (49 जागा), वाहनचालक (22 जागा), चपराशी (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती ôû http://mahades.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in व http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

* पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात 7 जागा

                 पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (1 जागा), बांधणी साह्यकारी (2 जागा), प्रक्रिया साह्यकारी (1 जागा) आणि मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (2 जागा), बांधणी साह्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 16 जागा

                मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती अंतर्गत परिचर प्रतिरुप (14 जागा), मुल प्रतवाचक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

 * भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्त्रो हिंदी टंकलेखकाच्या 5 जागा

भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) हिंदी टंकलेखक (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 20-26 ऑक्टोबरच्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top