मुंबई -: शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) पुणे व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवेच्या भरतीप्रक्रियेतील लेखी परीक्षा 3 नोव्हेंबर 2012 रोजी घेण्यात येणार आहे. 
  या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना पोस्टांद्वारे  पाठविण्यात आले असून  सदर प्रवेशपत्र   (हॉलतिकिट) संचालनालयाच्या www.mahdoesecondary.com या वेबसाईटवर उपलब्ध  करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना पोस्टाद्वारे प्रवेशपत्रे मिळू शकणार नाहीत, त्या उमेदवारांनी वेबसाईटवरून प्रवेशपत्राची प्रिंट काढून परीक्षेला येताना सोबत आणावे. प्रवेशपत्र मिळण्याबाबत अडचणी असल्यास त्यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी केले आहे.
 
Top