सोलापूर -: मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी शक्तीदेवी नवरात्र उत्सव 2012 तसेच कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर शहारात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2012 रोजी दसरा (विजयादशमी) निमित्त संपूर्ण दिवस सोलापूर शहारातील सर्व मद्य व ताडी दुकाने विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. तसेच दिनांक 28 ऑक्टोबर 2012 व 29 ऑक्टोबर 2012 या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर ते तुळजापूर या मार्गावरील हॉटेल शितल, हॉटेल न्यू टायटन, हॉटेल आर्या व हॉटेल दर्शन धाबा ह्या अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कारवाई करण्यात असे या आदेशात नमूद  करण्यात आले आहे.
             
*  मतदान कालावधीत मद्य विक्रीवर बंदी
सोलापूर -: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर 2012 या महिन्यात मुदती संपणा-या दिनांक 21 ऑक्टोबर 2012 रोजी ग्रामपंचायत निवडणूक 2012 या कार्यक्रम जाहिर झालेला आहे. (एकूण 54 ठिकाणी ग्रामपंचायतींचे निवडणूका) सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत 2012 चा निवडणूकीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व निवडणूक काळात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांना मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यातील ज्या निर्वाचन क्षेत्रात निवडणूक व मतमोजणी आहे तेथील देशी / विदेशी दारु दुकाने, बिअरबार, परमिट रु, ताडी विक्री दिनांक 20 ऑक्टोबर 2012 मतदानाचा अगोदरचा दिवस, दिनांक 21 ऑक्टोबर 2012 मतदानाचा पूर्ण दिवस व दिनांक 22 ऑक्टोबर 2012 मतमोजणी व निकाल जेथे आहे तेथे (मतमोजणी ठिकाण व वेळ) - जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कारवाई करण्यात असे या आदेशात नमूद  करण्यात आले आहे.
 
Top