न्‍यूयॉर्क -: जगातील प्रत्‍येक नेटीझन्‍स गुगलशी जोडलेला असतो. गुगलशिवाय संगणकाची कल्‍पनाही करता येत नाही. तसेच या महाकाय सर्च इंजिनचे काम कशावर चालते याचा आपण शोध घेण्‍याचा फारसा प्रयत्‍न करत नाहीत. नुकतीचे गुगलने आपल्‍या यांत्रिक साम्राज्‍याचा महत्‍त्‍वपूर्ण भाग असणा-या डाटासेंटरची कलरफूल छायाचित्रे प्रसिध्‍द केली असून डेली मेल या ब्रिटिश दैनिकाने त्‍यास ठळक प्रसिध्‍दी दिली आहे. गुगलच्‍या या डाटा सेंटरमध्‍ये कोटयावधी लोकांची माहिती साठविण्‍यात आलेली आहे. प्रत्‍यक्षात डाटा सेंटरचा आतील भाग पब आणि डिस्‍कोसारखा रंगीबेरंगी असतो. या सेंटरमध्‍ये एखादी जरी तांत्रिक अडचणी निर्माण झाली तर संपूर्ण गुगलची सेवाच ठप्‍प होण्‍याचा धोका असतो. सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव काही  मोजक्‍याच लोकांना या डाटासेंटरमध्‍ये प्रवेश देण्‍यात येतो. कधी काळी ज्‍या जागी पेपर मिल आणि अन्‍य कारखाने होते. तेथेच या डाटा सेंटरची उभारणी करण्‍यात आली आहे. बर्कले काऊंटी, कौन्सिल ब्‍लफ्स, डग्‍लस काऊंटी, मायेसा काऊंटी, हमिना, सेंट गिस्‍लेन या शहरात गुगलची डाटा सेंटर असून आता चिली, हॉंगकॉंग, तैवान आणि सिंगापूरमध्‍येही नव्‍या डाटा सेंटरच्‍या उभारणीचे काम युध्‍दपातळीवर सुरू असल्‍याची माहिती गुगलच्‍या सूत्रांनी दिली.
 
Top