नळदुर्ग -: बामसेफ संघटनेचे कार्य रचनात्‍मक पध्‍दतीने गतीमान होण्‍यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबीर रविवार दि. 28 ऑक्‍टोबर रोजी अकरा वाजता नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे.
फुले, आंबेडकरी विचारधारेच्‍या अंतर्गत बहुजन समाजाला संघटिक करण्‍याचे कार्य बामसेफ या बहुजन कर्मचारी संघटनेच्‍या माध्‍यमातून अधिक गतिमान केले जात आहे. ज्‍या लोकांमध्‍ये किंवा बहुजन समाज समाज समुहामध्‍ये आपला जन्‍म झाला, त्‍यांचा उध्‍दार करणे हे एक समाज ऋण म्‍हणून आपले कर्तव्‍य आहे. यासाठी परिवर्तनाच्‍या या वैचारिक लढ्यात आपण योगदान देत आहात. पुढील काळात बहुजनाच्‍या उत्‍थानासाठी बामसेफ/मुलानिवासी संघाच्‍यावतीने बहुजन बुध्‍दीजीवी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे संघटनात्‍मक कार्यरचनात्‍मक पध्‍दतीने गतीमान होण्‍यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. संघटनेचे ध्‍येय व उद्देश, संघटना वाढ व विकास, सभासद नोंदणी व पुढील कार्यकारिणी व कार्यक्रमाची रूपरेषा अन्‍य विषय या प्रबोधन शिबीरात घेण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक वक्‍ते म्‍हणून बामसेफचे मराठवाडा विभागीय अध्‍यक्ष बी.एच. नन्‍नवरे हे राहणार असून कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संघटनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष दयानंद सुरवसे तर संघटनेचे राज्‍य उपाध्‍यक्ष डी.आय. माने, राज्‍य कार्यकारिणी सदस्‍य एम.जी. पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हाध्‍यक्ष भैरवनाथ कानडे, उपाध्‍यक्ष एम.ए. कांबळे, तुळजापूर तालुकाध्‍यक्ष नेताजी क्षिरसागर, दिलीप भालेराव, बी.के. सुर्यवंशी, अंगुले एच.डी., आर.एस. डावरे आदीनी केले आहे.
        
 
Top