नळदुर्ग -: सांस्‍कृतिक स्‍त्रोत व प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्‍लीच्‍यावतीने देण्‍यात येणा-या राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील श्री भैरवनाथ माध्‍यमिक विद्यालयातील सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांची निवड करण्‍यात आली आहे.
सांस्‍कृतिक स्‍त्रोत व प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रतिमा गुप्‍ता यानी भैरवनाथ कानडे यांची सदरील प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निवड झाल्‍याचे पत्राद्वारे कळविले आहे. 'आमची सांस्‍कृतिकता व विविधता' या विषयावरील प्रशिक्षणासाठी देशभरातून व राज्‍यातून ठराविक शिक्षकांची निवड केली जाते. त्‍यातून कानडे यांची निवड झाली असून दि. 31 ऑक्‍टोबर ते दि. 7 नोव्‍हेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण नवी दिल्‍ली येथे होणार आहे, असेही सांगण्‍यात आले आहे.
 
Top