सोलापूर -: राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
रविवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सांताक्रुझ येथून विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.२० वाजता सोलापूर विमानतळ हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने रुध्देवाडी ता. अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी ९.३० वाजता मातोश्री शुगर को जनरेशन हेलिपॅड, रुध्देवाडी येथे आगमन व मातोश्री लक्ष्मी शुगर को - जनरेशन इंडस्ट्रिज लि. सहवीज निर्मित प्रकल्प उभारणी व प्रथम गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता मातोश्री शुगर को जनरेशन हेलिपॅड, रुध्देवाडी येथून हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी १०.४५ वाजता फत्तेसिंह मैदान हेलिपॅड, अक्कलकोट येथे आगमन व मोटारिने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी १०.५५ वाजता कार्यक्रमस्थळ येथे आगमन व राखीव, (स्थळ - अक्कलकोट स्वामी आश्रम, अक्कलकोट) दुपारी १२.४० वाजता फत्तेसिंह मैदान हेलिपॅड, अक्कलकोट येथून उत्तर सोलापूरकडे प्रयाण. दुपारी १२.५० वाजता बी.एम.आय.टी. कॉलेज समोर, हिरज फाटा, हेलिपॅड, उत्तर सोलापूर येथे आगमन व मोटारिने सिध्दनाथ शुगर मिल, ति-हेकडे प्रयाण. 
दुपारी १२.५५ वाजता सिध्दनाथ शुगर मिल, ति-हे येथे आगमन.  दुपारी १ वाजता सिध्दनाथ शुगर मिल, ति-हे सोलापूर तृतीय ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम. दुपारी २.३० वाजता हिरज फाटा हेलिपॅड, ति-हे येथून हेलिकॉप्टरने खर्डी. ता. पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी २.५० वाजता सिताराम महाराज साखर कारखाना येथील मोकळ्या जागेतील हेलिपॅड, खर्डी येथे आगमन व मोटारिने सिताराम महाराज साखर कारखाना, खर्डी येथे आगमन. दुपारी ३ वाजता सिताराम महाराज साखर कारखाना गळीत हंगाम व १० मे. वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. 
दुपारी ४  वाजता सिताराम महाराज साखर कारखाना हेलिपॅड, खर्डी येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ४.२०  वाजता सोलापूर विमानतळ हेलिपॅड येथे आगमन व विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

 
Top