नळदुर्ग -:, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी खुदावाडी गावास भेट दिली असता नूतन सदस्‍य  व ग्रामस्‍थांच्‍यावतीने त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. तुळजापूर तालुक्यातील बहुचर्चित खुदावाडी ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. राष्ट्रीय कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलने सातपैकी सात जागेवर विजय मिळवून संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनलचा पराभव केला. 
             खुदावाडी ग्रामपंचायत नऊ जागेसाठी कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनल व संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र यापैकी कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडल्यामुळे सात जागेकरीता निवडणुक झाली. या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे ७ उमेदवार निवडून आले असून त्यामध्ये सुशिला पवार, प्रियंका राठोड, प्रतिभा सांगवे, सुरेश गायकवाड, मनोज कबाडे, स्वामी रेवणसिद्ध, शिवाप्पा जवळगे यांचा समावेश आहे.
            खुदावाडी येथे नूतन सदस्‍यांच्‍यावतीने पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण्‍ा यांचा सत्‍कार करण्‍यात आले असून प्रभाक क्रमांक तीन मधून प्रचंड मताने विजयी झालेल्‍या नूतन सदस्‍या सुशिला पवार यांचा पालकमंत्र्यांनी सत्‍कार केला. त्‍याचबरोबर यावेळी खुदावाडी ग्रामस्‍थांच्‍यावतीनेही ना. चव्‍हाण यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमास प्रतिष्ठित ग्रामस्‍थ मोठया संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top