नळदुर्ग -: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत ग्रंथालय संचानलयाच्या वतीने उत्कृष्ठ ग्रंथालय व कार्यकर्ते, कर्मचा-यांना जाहीर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा दि. ३० ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमावर मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्यावतीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
              ग्रंथालय संचानलयाच्यावतीने उत्कृष्ठ ग्रंथालयाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर उत्कृष्ठ ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचार्‍यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र हा पुरस्कार देवून गौरविण्यात येतो. २०११-१२ चा पुरस्कार वितरण सोहळा दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. मात्र पुढील कारणामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून शिफारस नकारार्थी असताना आणि २०१०-११ मध्ये इतिवृत्तांत नोंद असताना २०११-१२ च्या पुरस्कारासाठी निवड करणे, २१ ते २५ मे २०१२ मध्ये झालेल्या तपासणीला मंत्रीमंडळाने निर्णय दिला नसतानाही अकार्यक्षम ठरवून अनुदान नाकारणे, खालच्या वर्गाचे अनुदान देणे, अनुदानात कपात करणे हे अन्याय असून ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचार्‍याशी चर्चा करुन वरील निर्णय घेण्यात आल्याचे मराठवाडा ग्रंथालयाचे अध्यक्ष व.ग. सूर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
 
Top