सोलापूर  :  महसूल व खार जमिन मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
रविवार दिनांक 28 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 9.00 वाजता सांताक्रुझ येथून विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.20 वाजता सोलापूर विमानतळ हेलिपॅड येथून  हेलिकॉप्टरने रद्देवाडी ता. अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता मातोश्री शुगर को जनरेशन हेलिपॅड, रुध्देवाडी येथे आगमन व मातोश्री लक्ष्मी शुगर को - जनरेशन इंडस्ट्रिज लि. सहवीज निर्मित प्रकल्प उभारणी व प्रथम गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी 10.30 वाजता मातोश्री लक्ष्मी शुगर को - जनरेशन येथून शासकीय मोटारिने उस्मानाबादकडे प्रयाण.

* उस्‍मानाबाद जिल्‍हा दौरा
उस्मानाबाद -: राज्याचे महसूल व खार जमीन मंत्री  बाळासाहेब थोरात हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून ते  रविवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रुद्देवाडी ता. अक्कलकोट येथून  शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण होईल. दु. २.३० वाजता  शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद  येथे आगमन व राखीव. दु.३.३० वाजता मंत्री महोदय उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने बीडकडे प्रयाण करतील.




 
Top