सोलापूर -:  गृह, ग्रामविकास, आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
शनिवार दि. २७ ऑक्‍टोबर रोजी  रात्रौ १०.३० वाजता कोल्हापूर येथून मोटारिने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व मुक्काम. रविवार दि. २८ ऑक्टोबर  रोजी सकाळी ७.३० वाजता मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन हेलिपॅड, इंडस्ट्रिज लि. रद्देवाडी ता. अक्कलकोट कडे प्रयाण. सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमस्थळी आगमन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता मोटारिने ति-हे ता. उत्तर सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सिध्दनाथ शुगर मिल ति-हे ता. उत्तर सोलापूर तृतीय ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम.  सोयीनुसार मोटारिने कोल्हापूरकडे प्रयाण.
 
Top