नळदुर्ग -: श्री जगदंबा देवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट संचलित श्री अंबाबाई मंदिरात येत्या मंगळवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नळदुर्ग शहरातील सासरवासीन लेकीनी देणगी देवून मंदिराच्या कळस स्थापनेत हातभार लावल्याने त्या सर्व सासरवासीन लेकीचा मंदिर जिर्णोद्धार समितीकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील सासरवासीन लेकीनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष नितीन कासार, मंदीर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष शरद बागल, मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले आहे.

 
Top