* उस्‍मानाबाद येथे २० हजाराची गावठी दारू जप्‍त; दोघांना अटक
उस्‍मानाबाद -: येथे बेकायदेशीररित्‍या गावठी हातभट्टी दारू बाळगलेल्‍या दोघांना अटक करून दोघांकडून ५०७  लीटर गावठी हातभट्टी दारू स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पोलीसांनी जप्‍त केली. त्‍याची किंमत २० हजार ३३० रूपये आहे.
           रमेश शिवाजी पवार (वय 30 वर्षे, रा. जुना बस डेपो, उस्‍मानाबाद), मुस्‍ताफा मुज्‍जोद्दीन शेख (वय 35 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्‍मानाबाद) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींचे नावे आहेत. दि. 26 ऑक्‍टोबर रोजी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी उस्‍मानाबाद येथील जुना बस डेपो व तांबरी विभागात छापा मारला असता, रमेश पवार याच्‍या ताब्‍यातून ५०० लीटर हातभट्टी दारू किंमत २० हजार रूपये तर मुस्‍ताफा शेख याच्‍या ताब्‍यातून ७ लीटर हातभट्टी दारू किंमत ३३० रूपये असे पोलीसांना मिळून आले. पुढील तपास हवालदार सांगळे करीत आहेत.

* किरकोळ कारणावरून मारहाणीत दोघे जखमी
उस्‍मानाबाद -: किरकोळ कारणावरून दगडाने डोक्‍यात मारून दोघांना गंभीर जखमी केल्‍याची घटना घाटंग्री (ता. उस्‍मानाबाद) या गावात दि. २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा वाजता बालाजी भागवत शिंदे यांच्‍या दुकानासमोर घडली.
           विनोद विजय विभुते, विजय बाबुराव विभुते याना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली, तसेच दगडाने डोक्‍यात मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याची फिर्याद विनोद विजय विभुते यांनी दि. २६ ऑक्‍टोबर रोजी उस्‍मानाबाद ग्रामीण पोलीसांत दिल्‍यावरून कल्‍याण शिवदास शिंदे, विष्‍णू शिवदास शिंदे यांच्‍याविरूद्ध पोलीसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्ष‍क एफ.एस. पाटील हे करीत आहेत.

 * मोटारसायकल अपघातात एक ठार
कळंब -: कळंब ते ढोकी जाणा-या रस्‍त्‍यावरील भाटशिरपुरा शिवारातील रोडवर झालेल्‍या भरधाव  मोटारसायकल अपघातात एकजण ठार झाल्‍याची घटना दि. २५ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
           अंगद शंकर सिरसाट (वय २३ वर्षे, रा. जवळा खु, कळंब) असे अपघातात मरण पावलेल्‍या मोटारसायकलस्‍वाराचे नाव आहे.बाळू कांबळे , कैलास कांबळे (दोघे रा. जवळा) असे जखमीचे नाव आहे.बाळू कांबळे यांच्‍या फिर्यादीवरून मयताच्‍याविरूध्‍द शिराढोण  पोलिसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोल्‍हे करीत आहे

   * अनाधिकृत पाणी उपसा करणा-या तिघा शेतक-याविरूद्ध गुन्‍हा
वाशी -:  नांदगाव (ता. वाशी) शिवारातील पाण्‍याच्‍या साठवण तलावातून विद्युत मोटारीद्वारे अनाधिकृतपणे शेतासाठी पाणी चोरून घेत असताना तिघा शेतक-याविरूद्ध वाशी पोलीसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.  ही घटना दि. २५ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता घडली.
                  रघु गोरख बांगर, पांडुरंग सदाशिव शारूख, मुरलीधर तुळशीराम घुले (सर्व रा. नांदगाव, ता. वाशी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍यांचे नावे आहेत. यातील वरील लोकांना तहसिलदार वाशी यांनी पाण्‍याचा उपसा बंद करण्‍याबाबत लेखी सांगूनही साठवण तलावातील पाणी इलेक्‍ट्रीक तारेवर आकडा टाकून विद्युत मोटारीद्वारे अनाधिकृतपणे त्‍यांच्‍या शेतात पाणी चोरून घेत असताना मिळून आल्‍याने सुहास धोंडोपंत कुलकर्णी (मंडळाधिकारी तेरखेडा) यांच्‍या तक्रारीवरून पोलीसात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून तपास हवालदार जाधव करीत आहेत.

* डिकसळ येथे महिलेचा विनयभंग
कळंब -: एका २० वर्षीय महिलेस एकटी असल्‍याचे पाहून तिची छेडछाड करून विनयभंग केल्‍याप्रकरणी एकाविरूद्ध कळंब पोलीसात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. दि. २१ ऑक्‍टोबर रोजी रात्री दहा वाजता व दि. २५ ऑक्‍टोबर रोजी दुपारी अडीच वाजता डिकसळ येथील फिल्‍टर टाकीजवळ बबलु पांडुरंग जाधव (रा. डिकसळ) याने एका २० वर्षीय महिलेस एकटी असल्‍याचे पाहून छेडछाड करून विनयभंग केल्‍याची फिर्याद त्‍या महिलेने दिल्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार उंबरे हे करीत आहेत.

*   अज्ञात वाहनांच्‍या धडकेत मोटारसायकलस्‍वार ठार
येणेगूर -: राष्‍ट्रीय महामार्गाने जाणा-या मोटारसायकलस्‍वारास अज्ञात वाहनचालकाने जोराची धडक देऊन झालेल्‍या अपघातात मोटारसायकलस्‍वार जागीच ठार झाल्‍याची घटना दि. २५ ऑक्‍टोबर रोजी येणेगूर शिवारात  घडली आहे. सागर शाम गिरी (वय 20 वर्ष, रा. सुपतगाव, ता. उमरगा) असे अपघात मरण पावलेल्‍या युवकाचे नाव आहे. एमएच १३/एए ९५६७ या मोटारसायकलवर सागर गिरी मुरूममोडहून सुपतगाव कडे जात असताना समोरून येणेगूरहून उमरगाकडे भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाने मोटारसायकला जोराची धडक दिली. याप्रकरणी दत्‍तात्रय शंकर गिरी (रा. सुपतगाव) यानी अज्ञात वाहनाचालकाविरूद्ध मुरूम पोलीसात तक्रार दिल्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निंगदळे हे करीत आहेत.
 
Top