सोलापूर -: बुधवार दि. २४ ऑक्‍टोबर रोजी हिंदू बांधवाचा पवित्र सण दसरा व दि. 26 ऑक्टोबर रोजी मुस्लिम बांधवांची पवित्र बकरी ईद साजरी होत असून हे दोन्ही सण हिंदू - मुस्लिम बांधवांनी अत्यंत आनंदाने साजरे करावेत. या सणाद्वारेच राष्ट्रीय एकात्मता व एकोपा नांदेल असा ठाम विश्वास राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. ना. लक्ष्मण ढोबळे यांनी आपल्या शुभेच्छापर संदेशात व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व आबालवृध्द, लहान थोरांना पुन्हा एकदा या दोन्ही सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा.  

 
Top