सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, दिवंगत माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना कळविण्यात येते की, ज्या माजी सैनिकांचे पाल्य इयत्ता १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत व शैक्षणिक वर्ष सन २०१२-१३ मध्ये BE, B Tech, BDS, MBBS, B Ed, BBA, BCA, B. Pharm, MBA, MCA  या अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षामध्ये शिकत आहेत अशांनी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेकरीता दि. १० नोव्हेंबर २०१२ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत.
              अर्जाचा नमुना व त्यासोबत लागणा-या कागदपत्राचे विवरण हे www. desw.gov.in  या वेबसाईटवर देण्यात आलेले आहे. दि. १०  नोव्हेंबर २०१२ नंतर सादर करणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.

 
Top