सोलापूर -:  परिवहन विभागातर्फे बार्शी येथे नागरिकांच्या सोयीसाठी घेण्यात येणारे शिबीर हे महिन्यातून  तीन दिवसां ऐवजी चार दिवसांचे घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पहिल्या पंधरावड्यात दोन दिवस व दुस-या पंधरावड्यातील २ दिवस असे महिन्यातील चार दिवस हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
              प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी व शनिवारी तसेच तिस-या शुक्रवारी व शनिवारी असे शिबीर कार्यालयाचे दिवस राहतील. तरी नागरिकांनी व मोटार वाहन मालक व चालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले..

 
Top