सोलापूर -: केंद्रीय गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे हे रविवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांचे दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.५५ वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी १० वाजता मातोश्री लक्ष्मी शुगर सह वीज निर्मिती उद्योग लि. रद्देवाडी येथील १६ मेगावॅट प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती .(स्थळ - रद्देवाडी ता. अक्कलकोट जि. सोलापूर) दुपारी १२.३० ते १ वाजता राखीव. दुपारी २ वाजता सिध्दनाथ साखर कारखान्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - ति-हे ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर) दुपारी ४ वाजता श्री. वसंतराव कल्याणराव काळे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - पंढरपूर जि. सोलापूर) सायंकाळी ५ ते ५.३० वाजता राखीव. सायंकाळी ६ वाजता सोलापूर वृत्तदर्शन या साप्ताहिकाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी ६.३० वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. सोलापूर येथे मुक्काम.
सोमवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता स्व. किसनलाल मर्दा व स्व. रतनचंद शहा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - श्री. संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा जि. सोलापूर) दुपारी १२ वाजता श्री. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ - पंढरपूर जि. सोलापूर) रात्रौ १०.४५ वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
