सोलापूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे बुधवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्रौ १.१० वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथून रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्रौ १.१५ वाजता पुणे येथून हुसेन सागर एक्सप्रेसने सोलापूरकडे प्रयाण. पहाटे ५.३५ वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी ५.४५ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ८ ते १० वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी. दुपारनंतर सोलापूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे मुक्काम.
गुरुवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १० वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांसमवेत विविध विषयांबाबत चर्चा. (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती सोलापूर मार्फत बेटीओंकी विजयादशमी अभियानाचे लोकार्पण व नवरात्र महोत्सव पुरस्कार २०१२ चे वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ - हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर दुपारनंतर सोलापूर येथील विविध कार्यक्रमांस उपस्थिती. रात्रौ शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम.
