नळदुर्ग -: येथील दमयंती महिला शिक्षण संस्‍थेच्‍या अंजनी प्रशालेतील शिक्षक संजय दळवी यांची कॉंग्रेस शिक्षक सेलच्‍या जिल्‍हाध्‍यक्षपदी यांची निवड झाल्‍याने मुंबई येथे त्‍यांना निवडीचे पत्र लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले. यावेळी कॉंग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे, मनोज पाटील, बसवराज पाटील नळेगावकर, अरूण मुगदिया आदीजण उपस्थित होते.
 
Top