उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार,दि. 26 रोजी सकाळी 10-30 वाजता सोलापूर येथून तामलवाडी, तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता तामलवाडी येथे आगमन व पाणी/चारा टंचाईबाबत ग्रामस्थांशी चर्चा. स.11-30 वा. पिंपळा (बु.) ता. तुळजापूर गावास भेट व ग्रामस्थांशी चर्चा. दु.12-30वा.देवकुरळी ता. तुळजापूर येथे सांस्कृतिक सभागृह बांधकामाच्या जागेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु.1 वा. पिंपळा खुर्द ता. तुळजापूर या गावास भेट व ग्रामस्थांशी चर्चा. दु.1-30 वा. सुरतगाव ता.तुळजापूर गावास भेट व ग्रामस्थांशी चर्चा. दु.2-15 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे राखीव आणि सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण व राखीव.
शनिवार,दि.27 रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.12 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव आणि सोईनूसार उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण व राखीव. रविवार,दि.28 रोजी 8-30 वा. अणदूर येथून सातलींगनगर, ता.अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण.
