तुळजापूर -: दोघांनी अवैध देशी दारूच्या बाटल्या बाळगल्याचे पोलीसांना मिळून आले. ही घटना तुळजापूर येथे दि. 23 ऑक्टोबर रोजी घडली. नागनाथ चौगुले (वय 25 वर्षे, रा. वेताळनगर, तुळजापूर), धनंजय पवार (वय 40 वर्षे, रा. तुळजापूर) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपीकडून 655 रूपये किंमतीची देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
येरमाळा -: माहेरहून घर बांधण्याकरीता एक लाख रूपये घेऊन ये, असे म्हणून एका विवाहित महिलेस सासरच्यानी छळ, जाचहाटप्रकरणी कळंब न्यायालयाच्या आदेशाने पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत चौधरी, चंद्रसेन चौधरी, मोहिजाबाई चौधरी (रा. पिंपळवाडी, ता. बार्शी), सौ. सुवर्णा कांदे (रा. पानगांव), सौ. भाग्यश्री खोसे (रा. इजोरा) असे गून्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील मौजे सापनाई (ता. कळंब) येथील सौ. अदिका श्रीकांत चोधरी हिस तिच्या सासरचे वरील लोकांनी माहेरहून एक लाख रूपये घेऊन ये म्हणून सतत शिवीगाळ, मारहाण करून उपाशी पोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ करून त्रास दिला असल्याची फिर्याद अदिका चौधरीनी न्यायालयात दिली. पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे हवालदार सुर्यकांत ढाकणे हे करीत आहेत.
उस्मानाबाद -: भरधाव जाणा-या भाविकाचा रिक्षा उलटून एक भाविक ठार झाल्याची घटना शिंगोली गावच्या उत्तर बाजूस असलेल्या पुलाजवळ दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता घडली.
यशवंत हरिदास मस्के (वय 36 वर्षे, रा. सावळेश्वर, पैठण ता. केज, जि. बीड) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव आहे. तर सखाराम मोहनराव चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुंदर मस्के (रा. सावळेश्वर) यांच्यासोबतच्या इतर लोकासह देवी दर्शनासाठी रिक्षा क्रमांक एमएच 23 /192 मध्ये बसून तुळजापूरकडे जात असताना रिक्षाचालक सखाराम मोहनराव चौधरी याने रिक्षा निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून पलटी केला. रिक्षाचालकाविरूद्ध सुंदर मस्के यांनी उस्मानाबाद पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खारगे करीत आहेत.
वाशी -: अज्ञात कारणावरून एका युवकास ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून व बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना डोकेवाडी (ता. भूम) येथे दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
अविनाश पवार, अशोक पवार (रा. डोकेवाडी, ता. भूम) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. अण्णा तुकाराम आहेर (वय 21 वर्षे, रा. डोकेवाडी, ता. भूम) असे जखमी युवकाचे नाव आहे. यातील आरोपीनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने अण्णा आहेर याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची फिर्याद शाहु दादाराव आहेर यांनी वाशी पोलिसांत दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे हे करीत आहेत.
तुळजापूर -: सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहित तरूणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काठी (ता. तुळजापूर) येथे दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरच्या चौघांविरूद्ध तामलवाडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. सारिका रविकिरण कात्रे (वय 19 वर्षे, रा. काठी, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर रविकिरण जनार्धन कात्रे, जनार्धन कात्रे, निता जनार्धन कात्रे, अण्णा जनार्धन कात्रे (सर्व रा. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत. यातील मयत सारिका कात्रे हिस वरील लोकांनी संगनमत करून हुंड्यातील राहिलेल्या पैशाची मागणी करून सतत शिवीगाळ व मारहाण करीत होते . शारीरिक व मानसिक त्रास देवून जाचहाट केल्याने सारिका यानी काठी शिवारातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची फिर्याद गणेश महादेव अंधारे (वय 26 वर्षे, रा. काठी) यानी तामलवाडी पोलीसांत दिली. पोलीस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.
येरमाळा -: दारू पिवून शिवीगाळ करून दगडाने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बावी (ता. वाशी) येथे घडली. ज्ञानेश्वर दत्तु कवडे (वय 24 वर्ष) असे जखमीचे नाव आहे. तर प्रशांत विष्णु कवडे (रा. बावी, ता. वाशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता घडली, अशी फिर्याद ज्ञानेश्वर कवडे यानी दि. 24 ऑक्टोबर रोजी येरमाळा पोलीसात दिली. पुढील तपास हवालदार जगताप करीत आहेत.
