उमरगा -: राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील उमरगा रोडवर भरधाव वेगाने येणा-या लक्‍झरी बसने रोडवर पायी चालत जाणा-या एका इसमास जोराची धडक दिल्‍याने तो गंभीर जखमी होवून मरण पावल्‍याची घटना दि. २८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी तीन वाजण्‍याच्‍या सुमारास उमरगा येथील महाराष्‍ट्र ट्रक्‍टर गॅरेज समोरील रोडवर घडली.
                लक्‍झरी बस (क्रं. केए 0१ एए ६३९०) चा चालक मोहमंद वाजीदखान मोहमंद सुलेमान खान (रा. शिवपुर ता. बसवकल्‍याण) याने त्‍याच्‍या ताब्‍यातील लक्‍झरी बस हयगयीने व निष्‍काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून रोडने पायी जाणा-या एका ६० वर्षीय अनोळखी इसमास जोराची धडक दिली. त्‍यात तो इसम गंभीर जखमी होवून मरण पावला. याप्रकरणी  पोउपनि हरीदास जाधव यांनी दि. २९ ऑक्‍टोबर रोजी उमरगा पोलीसात फिर्याद दिल्‍यावरून बसचालकाविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून तपास पोउपनि जाधव हे कीरत आहेत.

* जीप-ट्रॅक्‍टरच्‍या अपघातात दोघे गंभीर
परंडा -: भरधाव वेगाने येणा-या जीपने रोडवर उभा असलेल्‍या ट्रॅक्‍टरला जोराची धडक दिल्‍याने दोघे जखमी झाल्‍याची घटना दि. २८ ऑक्‍टोबर रोजी पाच वाजण्‍याच्‍या सुमारास परंडा ते सोनारी रोडवर एमएसईबी व खानापूर पाटीच्‍या मध्‍ये घडली. या अपघातात जीपचे सात लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
                   नानासाहेब भगवान पवार (वय 35 वर्षे, रा. कारंजा), लक्ष्‍मण सौदागर गोरे (रा. कारंजा) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. यातील जीप (क्रं. एमएच २५ आर ५५१४) चा चालक लक्ष्‍मण हा त्‍याच्‍या ताब्‍यातील जीप हयगयीने व निष्‍काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून रोडवरील ट्रक्‍टर (क्रं.२५ ए ५५१४) च्‍या मागील बाजूस जोराची धडक दिल्‍याने वरील दोघे जखमी झाले. नानासाहेब पवार यानी परंडा पोलीसात फिर्याद दिल्‍यावरून जीपचालक लक्ष्‍मण गोरे याच्‍याविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. तपास पोलीस नाईक घादगीने करीत आहेत.


 
Top