उस्‍मानाबाद -: शहरातील इंदिरानगर येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची ५२ लिटर दारू मिळून आल्‍याने एकास अटक करून त्‍याच्‍या ताब्‍यातून २ हजार ४०  रूपयाचा माल जप्‍त करण्‍यात आला आहे. ही घटना दि. २८ ऑक्‍टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. नाना बळीराम सिरसाट (वय ३५ वर्षे)  असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍याविरूद्ध दारूबंदी कायद्यान्‍वये उस्‍मानाबाद पोलिसात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ननवरे हे करीत आहेत.
               तसेच देवसिंगा नळ (ता. तुळजापूर) येथील संजय बाबुराव तेलंग हा आपल्‍या कब्‍जात विना परवाना ११ देशी दारूच्‍या बाटला बाळगलेला मिळुन आल्‍याने त्‍यास अटक त्‍याच्‍याकडून ३१७ रूपयेचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे. ही घटना दि. २८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी तीन वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. आरोपीविरूद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्‍यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गिरी करीत आहेत.

* पाच जुगा-यांना अटक
शिराढोण -: नायगाव शिवारातील वसंत माळी यांच्‍या शेतातील चिंचेच्‍या झाडाखाली तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्‍यांच्‍याकडून ९९० रूपचाचा मुद्देमाल जप्‍त केला.
                  वसंत माळी, महादेव मेनकुदळे, बबरू माळी, व्‍यंकट यदाटे, तानाजी कोरे (सर्व रा. नायगाव) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींचे नावे आहेत. यातील सर्व आरोपी तिरट नावाचे जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून त्‍यांच्‍याकडून जुगाराचे साहित्‍य व रोख रक्‍कम असा ९९० रूपयाचा मुद्देमाल हस्‍त केला. सर्व आरोपींविरूद्ध जुगार कायद्यान्‍वये शिराढोण पोलीसात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. 
 
Top