उस्‍मानाबाद -: महर्षि वाल्मिकी यांच्‍या जयंतीनिमित्‍त उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस विभागाच्‍या वतीने दि. २९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी अकरा वाजता वाल्मिकी यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. म‍हर्षि वाल्मिकी यांच्‍या प्रतिमेस जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पुष्‍पहार, फुले अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस उपअधिक्षक जगन्‍नाथ भोसले, अ.सत्‍तार शेख, राखीव पोलीस निरीक्षक जमादार, पोउपनि वाचक शाखेचे पंडीत, पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.

* पोलीस अधिक्षक कार्यालयात भ्रष्‍टाचार निर्मुलनाची शपत
उस्‍मानाबाद -: दि. २९ ऑक्‍टोबर ते दि. 3 नोव्‍हेंबर या कालावधीत दखता जनजागृती सप्‍ताह साजरा करण्‍यात येत आहे. त्‍यानिमित्‍ताने दि. २९ ऑक्‍टोबर रोजी उस्‍मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्‍टाचार निर्मुलन संबंधीची शपत दिली. यावेळी पोलीस उपअधिक्षक जगन्‍नाथ भोसले, अ.सत्‍तार शेख, राखीव पोलीस निरीक्षक जमादार, पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
 
 
Top