सोलापूर -: केंद्र शासनाकडून केरोसीनवर देण्यात येणारे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याबाबत शासनाने  कळविले आहे. पात्र शिधापत्रिकाधारकालाच या जोजनेचा लाभ घेता येईल. अशा शिधापत्रिकाधारकांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडावे. खाते उघडताना शिधापत्रिकाधारक हा पुरुष असल्यास त्यांनी त्यांचे कार्डात नमूद पत्नीचे नांव असल्यास दोघांचे नांवे राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त बचत खाते उघडावे/ पत्नी हयात नसल्यास शिधापत्रिकेत नोंद असलेली कुटूंबातील जेष्ठ स्त्री सदस्य असे दोघांचे नांवे संयुक्तरित्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडून खाते नंबर, दुकानदाराकडील विहीत नमुना फॉर्मात नोंदवून बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत द्यावी. शिधापत्रिकाधारक महिलांचे नांवे असल्यास त्यांनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असल्यास त्याचा खाते कमांक नोंदवावा. राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते नसल्यास नवीन खाते उघडून त्याचा क्रमांक नोंदविण्यात यावा.
     या मोहिमेसाठी आवश्यक असणारा विहीत नमुना फॉर्म आपल्या रास्त भाव धान्य दुकानामध्ये विनामुल्य स्वरुपात उपलब्ध असून सदरचा फॉर्म भरुन देताना शिधापत्रिकेची छायांकित प्रत राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याची छायांकित प्रत, गॅस सिलेंडर कार्डाची छायांकित प्रत तसेच आधार कार्डाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. सदरचे फॉर्म भरुन देण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2012 आहे. सदरची माहिती शासनाकडे 31 डिसेंबर 2012 पर्यंत सादर करावयाची आहे. 
 
Top