सोलापूर -: समतोल प्रादेशिक विकासाबद्दल लोकप्रतिनीधी व जनतेची मते जाणून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा पुणे विभागाचा दौरा दिनांक 3 व 4 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहे. पुणे व सोलापूर जिल्हयासाठी दिनांक 4 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे  व दुपारी प्रतापहॉल, अल्पबचत भवन, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे च्या पाठीमागे येथे चर्चा होणार आहे. त्याकरिता सोलापूर जिल्हयातील पालकमंत्री, मंत्री, संसद सदस्य, विधीमंडळ सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर व उपमहापौर यांचेशी  दिनांक 4 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 2 ते 3.30 या वेळेत व जिल्हयातील नगरपालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती व उपसभापती तसेच संस्था इत्यादी मान्यवरांशी दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत उच्चस्तरीय समिती चर्चा करणार आहेत.
सदर बैठकीत जिल्हयाच्या विकासाबाबत उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे व्यापक जनहिताच्या शाश्वत व पर्यावरण पुरक विकासात्मक बाबी बाबत चर्चा उपेक्षित असून जिल्हयाचा / विभागाचा समतोल विकास होण्याकरिता जनतेने काही सुचना असल्यास लेखी निवेदनाव्दारे समितीपुढे सादर करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 
Top