मुंबई : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री सचिन मोहन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे सदर पद रिक्त झाले होते.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.201210201506476707 असा आहे.