उस्मानाबाद :- विशेष सहाय्य योजना कार्यक्रमातंर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना) लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या व घेवू इच्छिणा-या लाभार्थ्यांनी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे आधार ओळखपत्र उपलब्ध झालेले आहे. (तुळजापूर, नळदुर्ग नगरपालीका क्षेत्र) त्यांनी आपले आधार कार्ड तहसील कार्यालय, तुळजापूर येथे संजय गांधी विभागात किंवा संबंधित तलाठी यांच्याकडे दोन दिवसात दाखल करावेत, असे आवाहन तुळजापूरचे तहसीलदार व्ही.एल.कोळी यांनी केले आहे.
वरील योजने अंतर्गत तुळजापूर तालुक्यात लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना याद्वारे कळविण्यात येते की योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आधार कार्डच्या क्रमांकाची किंवा आधार कार्डाची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यानी आधारकार्डाची नोंद केली नसेल अशा लाभार्थ्यांनी दि. २८ ऑक्टोबर २०१२ ते दि. ११ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत नगर परिषद,तुळजापूर येथे आधार कार्डाची नोंदणी करुन घ्यावी व आधार कार्ड प्राप्त होताच त्याची प्रत या कार्यालयास दाखल करावी, असे कळविण्यात आले आहे.
