सोलापूर -: शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव. सकाळी ९ वाजता नागरिकांच्या भेटी (स्थळ- शासकीय विश्रामगृह, सोलापूर) सकाळी ९.३० वाजता काँग्रेस भवन येथे भेट. सकाळी १० वाजता सोलापूर येथून मोटारीने अक्कलकोटकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथे आगमन व शारदामाता इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- शिवपुरी, अक्कलकोट) दुपारी १२.१५ वाजता अक्कलकोट येथून मोटारीने सोलापुरकडे प्रयाण. दुपारी १.१५ वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे राखीव. दुपारी २ वाजता सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर-उस्मानाबाद-बीड मार्गे औरंगाबादकडे प्रयाण.
 
Top