उस्मानाबाद :- माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. जी. फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड  यांनी यावेळी स्वर्गीय इंदिरा गांधी  आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. 
            यावेळी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे स्वातंत्रसैनिक नामदेव माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
Top