तुळजापूर -: यमगरवाडी (मंगरूळ) ता. तुळजापूर येथील एकलव्य प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्‍यांचे राज्‍यस्‍तरीय मलखांब स्‍पर्धेसाठी निवड झाली आहे. 
          येडशी (ता. उस्मानाबाद) येथे झालेल्‍या विभागीय मल्लखांब स्पर्धेमध्ये यमगरवाडी येथील  अर्जुन राठोड व विठल जाधव यांनी 19 वर्षे वयोगटामध्‍ये नेत्रदिपक कामगिरी करून यश मिळविले.  त्‍यांची यवतमाळ येथे होणा-या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड करण्‍यात आली आहे. तसेच वंदना मंडवळे हिची जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे झालेल्या अॅथलेटीक्स मध्ये (200 मीटर धावणे) राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
  यशस्वी विद्यार्थ्‍यांचे व क्रीडा शिक्षकांचे सुरेशभाऊ पाटील (धुळे), अशोक बनकर, संतोष बनसोडे, डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. अभय शहापूरकर, प्रा. गजानन धरणे, गिरीष कुलकर्णी (मुंबई), रावसाहेब कुलकर्णी, महादेवराव गायकवाड, चंद्रकांत गडेकर, तुकाराम माने, उमाकांत मिटकर, मु.अ. विठठल म्हेत्रे, अण्णासाहेब मगर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
 
Top