तेरखेडा -:  किरकोळ कारणावरून दोन गटात कु-हाड व कु-हाडीच्‍या तुंब्‍याने झालेल्‍या तुफान मारहाणीत दोनजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना तेरखेडा येथे 21 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. या मारहाणीत एका इसमाचे दात पडले तर दुस-याच्‍या डोक्‍यात कु-हाडीने मारल्‍याने जबर मार लागला आहे. याप्रकरणी दोन्‍ही गटाने परस्‍परविरोधी येरमळा पोलीसात तक्रार दिल्‍यावरून आठजणांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
            उध्‍दव रावसाहेब साळवे, बाबा भगवान साळवे, तेजस बाबा साळवे, बालाजी बाबा साळवे, अल्‍का बाबा साळवे, प्रताप रावसाहेब साळवे, रावसाहेब भगवान साळवे, वच्‍छलाबाई रावसाहेब साळवे असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नावे आहेत. यातील आमच्‍या घरासमोर भांडे घासून नका चिखल होतोय, असे सांगितल्‍यावरून शिवीगाळ करून बालाजी बाबा साळवे याने शिवीगाळ करून मारहाण केली, अशी फिर्याद उध्‍दव रावसाहेब साळवे यानी पोलिसांत दिली. तर दुस-या गटाचे बाबासाहेब साळवे, यानी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, वरील पैकी चौघांनी संगनमत करून बाबासाहेब साळवे याना तुझ्या शेळ्या, कोंबड्या आमच्‍या घरासमोर येऊन घाण करतात, असे म्‍हणून भांडणाची कुरापत काढली. यावेळी लाथाबुक्‍क्‍यानी मारहाण केली. यावेळी वत्‍छलाबाई साळवे यानी बाबासाहेब साळवे यांच्‍या कु-हाडीने मारहाण करून जखमी केल्‍याची फिर्याद दिली. वरील आरोपीविरूद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असुन पुढील तपास हवालदार जगताप हे करीत आहेत.

* जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी पाच हजाराची अवैध दारू जप्‍त 
उस्‍मानाबाद -: पोलिसांनी दि. 21 ऑक्‍टोबर रोजी तुळजापूर, परंडा, कळंब तालुक्‍यात अचानक छापा मारून अवैध दारू, दारू तयार करण्‍याचे रसायन व साहित्‍य असे मिळून 4 हजार 905 रूपये किमतीचा मु्द्देमाल जप्‍त करून तिघांविरूद्ध दारूबंदी कायदान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.
       मस्‍सा अबाजी कांबळे (वय 32 वर्षे, रा. तुळजापूर), शेषेराव रानबा इंगळे (वय 48 वर्षे, रा. मानकेश्‍वर, ता. परंडा), संतोष पंढरी तांबरे (रा. अंदोरा, ता. कळंब) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींचे नावे आहेत.
 
Top