तुळजापूर -: तुळजापूर विकास प्राधीकरणातर्फे तुळजापुरातील श्री. तुळजाभवानी  मंदिरात कार्यान्वित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी  मुख्यमंत्री चव्हाण यांनी नवरात्रोत्सवाच्या औचित्य साधून श्री. तुळजाभवानीचे दर्शनही घेतले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री  सुरेश शेट्टी, खासदार डॅ. पद्मसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह, विभागीय आय़ुक्त संजीव जयस्वाल, तुळजापूर विकास प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे, प्राधीकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगांवकर, तुळजापुरच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना गंगणे, माजी आमदार आलुरे गुरूजी, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, विश्वास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          या सौर ऊर्जा प्रकल्पाची  क्षमता 81 कीलो वॅटची असून, त्याद्वारे  दररोज 200 युनिटसची निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील प्रशासकीय इमारत, पोलिस चौकी, मंदिर परिसरातील पथदिवे, धार्मिक कार्यालये, शिवाजी दरवाजा, देवीचा गाभारा, अभिषेक हाँल येथे विनाखंडीत विजपुरवठा सुरु राहणार आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह उपस्थित मंत्र्याचा श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
 
Top