उस्मानाबाद :- उस्मानाबाद व सोलापूर जिल्हयातील आदिवासींसाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनातर्फे  सोलापूर येथे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर येथे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
उस्मानाबाद  व सोलापूर जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांनी  विविध विकास योजानांचा लाभ घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी व  सेवायोजन नांव नोंदणीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तहसील कार्यालय सोलापूर इमारत,  उत्तर सोलापूर, सोलापूर या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी कळविले आहे.

 * अरुण निटूरे अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीवर
उस्मानाबाद :- केंद्र सरकारच्या अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी उस्मानाबाद येथील अरुण भाऊराव निटूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ही नियुक्ती झाल्याबाबत केंद्र सरकारच्या ग्राहक व अन्नधान्य वितरण मंत्रालयाचे उपसचिव ए.के. राणा यांनी श्री.निटूरे यांना कळविले आहे.
                     
*   लेखापरीक्षकांची नियुक्तीबाबत सूचना 
उस्मानाबाद :- सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण करावयाची कार्यवाही व उपाययोजनेबाबत लातूर विभागातील सर्व लेखापरीक्षकांना सूचित करण्यात येते की, लातूर विभागाची प्रमाणित लेखापरीक्षकांची सन 2013-2015 ची 24 ऑटोंबर ते 23 नोंव्हेंबर 2012 या कालावधीत पुरवणी नामतालिका तयार करण्यात येणार आहे.
यासाठी संबंधिताकडून आवेदनपत्र मागविण्यात येत असून नियुक्तीबाबतचे निकष व आवेदनपत्राचा नमुना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, बीड, नांदेड, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी कळविले आहे.

 
Top