सोलापूर -: पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण, रविवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता अणदूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने सातलिंग नगर मु. रुध्देवाडी पो. दूधनी ता. अक्कलकोट येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता मातोश्री लक्ष्मी शुगर को. जनरेशन इंडस्ट्रिज लि. या नव्याने उभारण्यात आलेल्या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभास उपस्थिती. (स्थळ - मातोश्री लक्ष्मी शुगर को. जनरेशन इंडस्ट्रिज लि. सातलिंग नगर मु. रुध्देवाडी पो. दूधनी ता. अक्कलकोट), दुपारी १ वाजता सिध्दनाथ शुगर मिल प्रा. लि. ति-हे ता. उत्तर सोलापूर येथील गळीत हंगाम समारंभास उपस्थिती (स्थळ - सिध्दनाथ शुगर मिल प्रा. लि. ति-हे ता. उत्तर सोलापूर ) दुपारी ३ वाजता सिताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लि. खर्डी ता. पंढरपूर या कारखान्याचा प्रथम ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - सिताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लि. खर्डी ता. पंढरपूर) सायंकाळी ७ वाजता अणदूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.४५ वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
