पाच हजाराची अवैध दारू जप्‍त
उस्‍मानाबाद -:   कळंब तालुक्‍यातील वाकडी येथे पोलिसानी अचानक छापा मारून 5 हाजाराची गावठी दारू जप्‍त केली. या घटनेत दोघांविरूद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.
       रूक्‍मीणबाई शंकर शिंदे (वय 50 वर्षे, रा. वाकडी ता. कळंब) यांच्‍याकडून 200 लिटर गुळमिश्रीत रसायन व 20 लीटर दारू असे मिळून सुमारे 2 हजार 400 रूपयाचा मुद्देमाल तर संगीता रमेश काळे यांच्‍याकडून 200 लीटर गुळमिश्रीत रसायन व 15 लीटर दारू असे मिळून 2 हजार 300 रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्‍तगत केला. याप्रकरणी वरील दोघांविरूद्ध कळंब पोलीसात दारूबंदी कायद्यान्‍वये गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. तपास हवालदार गोलेकर हे करीत आहेत.

अज्ञात वाहनचालकाच्‍या धडकेत एक ठार
मुरूम -: अज्ञात वाहनाच्‍या धडकेत मोटार सायकलस्‍वार ठार झाल्‍याची घटना दि. 31 रोजी राष्‍ट्रीय माहामार्गावर येणेगुर शिवारात सांयकाळी साडे सहा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली आहे.
श्रीशैल गुरूनाथ बिराजदार (वय 24 वर्षे) असे मरण पावलेल्‍या मोटारसायकल स्‍वाराचे नाव आहे.  याप्रकरणी दिलीप बिराजदार (रा. येणेगूर) यानी मुरूम पोलीसात फिर्याद दिल्‍यावरून अज्ञात वाहनचालकांविरूद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निंगदळे हे करीत आहेत.

मारहाणप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्‍हा दाखल
परंडा -: दोघांनी संगनमत करून घरात घुसून एकास शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्‍याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
उमेश बब्रुवार जाधव, युवराज महादेव मुळीक (दोघे रा. रूई) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍याचे नाव आहे. या दोघांनी परंडा तालुक्‍यातील दुधी येथे दि. 30 ऑक्‍टोबर सायंकाळी सात वाजण्‍याच्‍या सुमारास रघुनाथ रामहरी लोंढे (वय 30 वर्षे, रा. दुधी) यास शिवप्रतिष्‍ठान शाखेचे सभासद होत नसल्‍याने त्‍याच्‍या घरात घुसुन त्‍यास मारहाण केली व जीवे मारण्‍याची धमकी दिली, अशी फिर्याद रघुनाथ लोंढे यांनी दिली. पुढील तपास हवालदार बळे हे करीत आहेत.
 ***
भांडणाची कुरापत काढून मारहाणीत दोघे जखमी 
उस्‍मानाबाद -: मागील भांडणाची कुरापत काढून कु-हाडीच्‍या तुंब्‍याने केलेल्‍या मारहाणीत दोघेजण जखमी झाल्‍याची घटना चिलवडी (ता. उस्‍मानाबाद) येथे दि. 31 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
अर्जून जाधव, रत्‍नदीप जाधव, सुदर्शन जाधव (सर्व रा. चिलवडी) यानी संगनमत करून पोपट बोराडे (वय 50 वर्षे) व त्‍याच्‍या मुलास कु-हाडीच्‍या तुंब्‍याने मारहाण केले. यात दोघेजण जखमी झाले, अशी फिर्याद पोपट बोराडे यांनी उस्‍मानाबाद ग्रामीण पोलिसात दिल्‍यावरून वरील तिघांविरूद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

मलकापूर शिवारात अज्ञात इसमानी ट्रकचालकास लुटले
येरमाळा -: राष्‍ट्रीय महामार्गावरील मलकापूर शिवारात अज्ञात चौघा इसमानी कंटेनर चालकास जीवे मारण्‍याची धमकी देऊन 18 हजार रूपये जबरदस्‍तीने हिसकावून नेल्‍याची घटना दि. 31 ऑक्‍टोबर रोजी पहाटे साडे तीन वाजता घडली.
मलकापूर शिवारात कंटेनर (क्रं. एचआर 55/3432) हा बेंगलोर ते दिल्‍ली जात असताना पंम्‍चर झाल्‍याने मलकापूर पाटीजवळ थांबविला असता मोटारसायकलवर अनोळखी चार इसमानी येऊन चालकास जीवे मारण्‍याची धमकी देऊन त्‍याच्‍या खिशातील 18 हजार रूपये जबरीने चोरून नेल्‍याची फिर्याद येरमाळा पोलीसात चालक साहुनखान कल्‍लुखान (रा. 30 वर्षे, रा. जिव्‍हाना, जि. अलवर, राजस्‍थान) यानी दिल्‍यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास दुय्यम फौजदार गावंडे करीत आहेत.

परंडा येथे मोटारसायकलची चोरी
परंडा -: हीरो होंडा स्‍प्‍लेंडर कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यानी चोरून नेले. ही घटना दि. 17 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्‍याच्‍या दरम्‍यान परंडा येथील स्‍टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्‍या समोर घडली. त्‍यानंतर मोटारसायकलचा शोध घेतला असता मिळून आली नाही, मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 25 ए 9182, किंमत 45 हजार रूपये) अज्ञात चोरट्याविरूद्ध दत्‍तात्रय भोसले यांच्‍या फिर्यादीवरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. तपास हवालदार विभुते करीत आहेत.
 
Top