* केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन (184 जागा) भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालयात 30 जागा
मुंबई येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक टंकलेखक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/टिप्पणी सहायक (3 जागा), भांडारपाल (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), कुशल कारागिर (1 जागा), वीजतंत्री (3 जागा), यांत्रिकी/यंत्रकारागिर (2 जागा), लोहार (1 जागा), यंत्रपरिचर (1 जागा), निदेशक –मुद्रण (1 जागा), सहाय्यक रासायनिक-चर्मकला (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdteromumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत वैद्यकीय सल्लागार (10 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.