सोलापूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूर  जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरुवार दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री १०.२० वाजता शासकीय वाहनाने मुंबई सी.एस.टी.कडे प्रयाण. व रात्रौ १०.४२ वाजता मुंबई सी.एस.टी. येथे आगमन व मुंबई सी.एस.टी. येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूरकडे प्रयाण. शुक्रवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन व शासकीय वाहनाने सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.20 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी ९ वाजता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी (स्थळ - शासकीय विश्रामगृह, सोलापूर) दुपारी १ वाजता दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांचा सत्कार (स्थळ - हॉटेल प्रथम, सातरस्ता, सोलापूर) दुपारी ४ वाजता सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित पुनर्वसनाची कामे व जमीन वाटपाबाबत बैठक (स्थळ - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर) सायंकाळी ६ वाजता श्री. विपत, उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - गांधीनगर, प्लॅट नं ४१, सोलापूर) रात्रौ सोलापूर विश्रामगृह येथे मुक्काम.
 
Top