सोलापूर -: महाराष्ट्र राज्य वफ्त 2012 मतदार यादीचा कार्यक्रम मतदार नोंदणी अधिकारी, महाराष्ट्र राज्य तथा अप्पर जिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. मतदार यादीची प्रारुप प्रसिध्दी दि. 26 नोव्हेंबर 2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसिध्दी केलेली आहे. मतदार यादी व मतदार यादीबाबतचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा येथे उपलब्ध करण्यात आला आहे.
तरी मतदार यादीचे अवलोकन करावे असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वफ्त 2012 यांनी आवाहन केले आहे.