सोलापूर -: जिल्हा परिषद, सोलापूर कडील बांधकाम विभाग क्र 1 व 2 लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील पाच लाखाच्या आतील कामे सोलापूर जिल्हा परिषेदकडील नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था यांना लॉटरी पध्दतीने काम वाटप सभा शुक्रवार दिनांक 23 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव सभागृहात जिल्हा परिषद, सोलापूर येथे बोलविण्यात आली आहे.
या सभेस जिल्हा परिषदेकडील चेअरमन मजुर सहकारी संस्था यांनी वेळेवर हजर रहावे, हजर रहातेवेळी ओळखपत्र (नोंदणी प्रमाणपत्र), पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखपत्राशिवाय सभागृहात उपस्थित राहणेस परवानगी दिली जाणार नाही, काम वाटपाची यादी, अटी, नियम जिल्हा परिषद नोटीस बोर्डावर पहावयास मिळतील असे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र 1 सोलापूर तथा सचिव काम वाटप समिती जि.प. सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.