उस्मानाबाद -: लेखा व कोषागारे विभागाच्या मराठवाडा विभागाचे वेतनपडताळणी पथक उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर असून या दौ-यात हे पथक सेवापुस्तकांची पडताळणी करणार आहे.
दि. 23 रोजी जिल्हा /तालुकास्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे. सेवापुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन/ लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत, असे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी केले आहे.
सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबधित कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकारी यांचा संकेतांक (डीडीओ कोड) आणि सेवार्थ प्रणालीमधील संबधित कर्मचा-यांना संकेतांक क्रमांक (एम्प्लॉई कोड ) सह सादर करणे आवश्यक राहील, असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.