मुंबई : राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या मुंबईतील पोलीस जिमखाना येथील स्मारकास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार अमिन पटेल, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ.सत्यपालसिंह आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली दिली. तत्कालीन सह पोलीस आयुक्त हेमंत करकरे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर आदींच्या कुटुंबिय, नातलग आणि सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहिले. याप्रसंगी पोलिसांच्यावतीने शहिदांना मानवंदना देण्यात आली.